---Advertisement---

शेगाव-वरवट रोडवरील भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत 55 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू!

---Advertisement---

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव-वरवट रोडवरील भोनगाव फाट्यानजीक अज्ञात वाहनाने मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिल्याने 55 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 2 जुलै रोजी रात्री सुमारे 11 वाजता घडली. या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू श्रीकृष्ण मेहेंगे (वय 55, रा. आंस्वद, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा) हे त्यांच्या हिरो होंडा एसएस (क्र. MH 30 D 4961) या मोटारसायकलने शेगावहून वरवटकडे जात होते. दरम्यान, भोनगाव फाट्यानजीक समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने भरधाव व निष्काळजीपणे धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. तसेच मोटारसायकलीचे सुमारे 15 हजार रुपयांचे नुकसान झाले.

या घटनेप्रकरणी मृताचे पुत्र विशाल राजू मेहेंगे (वय 25, रा. आंस्वद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 204/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 281, 106(1) तसेच मोटार वाहन कायदा कलम 134/187 अन्वये अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनीत घाटोळ करीत आहेत. अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या अज्ञात वाहनचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment