---Advertisement---

शेगावमध्ये पत्नीला मारहाण; पतीविरोधात गुन्हा दाखल!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील पंचशील नगर परिसरात पतीने दारूच्या नशेत पत्नीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी पतीविरुद्ध दि 16 मे ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. शालीनी सुनिल गवारगुरु (वय 40, रा. पंचशील नगर, शेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सुनिल गवारगुरु याच्याविरुद्ध कलम 117(2) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 7 मे 2026 रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास फिर्यादी मजुरीचे काम करून घरी आल्या असता आरोपी पती दारू पिऊन घरी आला होता. दारू का पिली असा जाब विचारल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर बचत गटाचे पैसे भरण्यासाठी पैसे मागितल्याच्या कारणावरून आरोपी संतापला व फिर्यादीच्या नाकावर, डोक्यावर आणि तोंडावर जोरदार बुक्क्यांनी मारहाण केली.

या मारहाणीत फिर्यादी जखमी होऊन खाली पडल्या. त्यानंतर आरोपीने लाथांनी पाठीवर मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या फिर्यादींना त्यांच्या बहिणी व मुलींनी उपचारासाठी शेगाव येथील साई बाई मोटे सामान्य रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना GMC अकोला येथे हलविण्यात आले.

या प्रकरणाचा तपास पोहेका सुनील सुसर करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment