---Advertisement---

शेगावमध्ये प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू; अचानक श्वासाचा त्रास कारणीभूत!!

---Advertisement---

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. 4 मे 2026-शेगाव शहरातील नागरगोजे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान एका 34 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेचा अचानक श्वासाचा त्रास वाढल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे कलम 194 BNSS अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सौ. खुशबू जितेंद्र शर्मा (वय 34 वर्ष) रा. रेणुका माता मंदिराजवळ, बोदवड, जि. जळगाव यांना दि. 2 मे 2026 रोजी सायंकाळी 5:08 वाजता प्रसूतीसाठी नागरगोजे हॉस्पिटल, शेगाव येथे दाखल करण्यात आले होते.

दि. 4 मे 2026 रोजी सकाळी 9:20 वाजता त्यांना अचानक श्वासाचा त्रास सुरू झाला. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती हॉस्पिटलचे कक्षसेवक गणेश महादेव माळी (वय 32 वर्ष) यांनी डॉ. प्रविण नागरगोजे यांच्या सहीचा मेमो सादर करून पोलिसांना दिली.

या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल सरोदे यांनी नोंद घेतली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुनील सुसर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. घटनेची अधिक तपासणी सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment