---Advertisement---

शेगावीचा राणा’ गाण्याचे पोस्टर ऋषीभाऊ जाधव यांच्या हस्ते लाँच!!

---Advertisement---

मेहकरमध्ये विठू माऊली फिल्म्स क्रिएशनच्या नव्या प्रोजेक्टची जोरदार सुरुवात.

मेहकर(युवा क्रांती वृत्तसेवा) : दि.६ जुन- स्थानिक विठू माऊली फिल्म्स क्रिएशनच्या वतीने संत श्री गजानन महाराजांवरील आगामी व्हिडीओ सॉंग “शेगावीचा राणा” या गीताचे पोस्टर युवासेना सहसचिव ऋषीभाऊ प्रतापराव जाधव यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात लाँच करण्यात आले. यावेळी विठू माऊली फिल्म रेकॉर्डिंग स्टुडिओचे उद्घाटन देखील करण्यात आले. तसेच ऋषीभाऊ जाधव यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला आसाराम फंगाळ, उद्धव फंगाळ, विठ्ठल खरात, किरण कानोडजे, सिद्धार्थ जाधव, मनोहर म्हळसने, विजय डेव्हडे, नंदकिशोर कुडके आदी मान्यवर उपस्थित होते.

“शेगावीचा राणा” हे गीत डॉ. श्रीकृष्ण राऊत यांनी लिहिले असून त्याला संगीत प्रा. डॉ. हर्षवर्धन मानकर यांनी दिले आहे. या गीताचे कॅमेरा काम रागिणी स्टुडिओकडून करण्यात येणार असून दिग्दर्शनाची धुरा विजय फंगाळ सांभाळणार आहेत.

विशेष म्हणजे या गीतामध्ये नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, संभाजीनगर, मुंबई आणि रायगड येथील कलाकारांचा सहभाग असणार आहे. आगामी तीन महिन्यांत हे गीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून लवकरच गाण्याच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment