---Advertisement---

SIR प्रक्रियेसाठी मतदार यादी लवकरच होणार फ्रीज; अपूर्ण मॅपिंग तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन!!

---Advertisement---

शेगाव |(युवा क्रांती वृत्तसेवा) :11 जून 2026 – मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्या वतीने मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) 2026 अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच मतदार यादी फ्रीज करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या मतदारांचे मॅपिंग अद्याप अपूर्ण आहे त्यांनी त्वरित आपल्या यादी भागातील BLO (बूथ लेव्हल ऑफिसर) यांच्याशी संपर्क साधून आवश्यक माहिती सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निवडणूक विभागाच्या माहितीनुसार, BLO गृहभेटी 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत होणार आहेत. मतदारांनी voters.eci.gov.in किंवा ECINet App वर जाऊन आपला तसेच आई-वडिलांचा तपशील तपासून ठेवावा, असेही सांगण्यात आले आहे.

गृहभेटीदरम्यान BLO यांनी दिलेल्या गणना अर्जात आवश्यक माहिती भरून स्वाक्षरीसह त्याची एक प्रत BLO यांच्याकडे जमा करावी व दुसरी प्रत स्वतःकडे सुरक्षित ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जर मतदारांचे किंवा त्यांच्या आई-वडिलांचे नाव मागील SIR मध्ये नसल्यास नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. यामध्ये जन्म दाखला, पासपोर्ट, शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, सरकारी ओळखपत्र, राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुरावा, बँक किंवा टपाल कार्यालयाचे दस्तऐवज आदींचा समावेश आहे. तसेच आधार कार्ड देखील ओळखपत्राचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.

प्रशासनाने नागरिकांना “गृहभेटीदरम्यान BLO यांना सहकार्य करा” असे आवाहन करत “कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही आणि कोणतीही अपात्र व्यक्ती समाविष्ट होणार नाही” असा संदेश दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment