---Advertisement---

Shegaon News : वैभव सुधाकर जाधव यांची Central Bank मध्ये Senior Officer पदी नियुक्ती; शिवाजी मित्र मंडळातर्फे भव्य सत्कार!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : श्री छत्रपती शिवाजी नगर येथील रहिवासी वैभव सुधाकर जाधव यांची Central Bank मध्ये Senior Officer या पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल श्री शिवाजी मित्र मंडळाच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

या सत्कार समारंभात माजी नगरसेवक तथा युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय यादव यांच्या हस्ते वैभव सुधाकर जाधव यांचा शाल, पुष्पगुच्छ व सत्कारचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून वैभव जाधव यांचे अभिनंदन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना विजय यादव म्हणाले, “वैभवने आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन करून शिवाजी नगर परिसराचा लौकिक वाढवला आहे. त्याच्या या यशाचा परिसरातील युवकांनी आदर्श घ्यावा.”

वैभव जाधव यांच्या यशाबद्दल परिसरातील नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या सत्कार समारंभाला माजी नगरसेवक विजय यादव, ज्येष्ठ नागरिक रामविजय चव्हाण, सुधाकर जाधव, दिगंबर जाधव, उल्हास जाधव, सागर जाधव, चेतन जाधव, सुरेश नलावडे, प्रकाश चव्हाण, अशोक डांबे, प्रतीक यादव, किरण कुमकुळे, अभिजीत डांबे, अक्षय डांबे, सौरव भारताडे, अभी देवकते, करण देवकते, किशन चव्हाण आणि निलेश फर्ताडे यांची आवर्जून उपस्थिती होती.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment