शेगाव(युवा क्रांती वृत्तसेवा) : अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने शेगाव तहसील कार्यालयात वारकरी मानधनासंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. हे निवेदन तहसीलदारांमार्फत महाराष्ट्र शासन व मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यात आले.
निवेदनामध्ये वारकरी मानधनासाठी असलेली ५० वर्ष वयाची अट रद्द करावी, सर्व दुर्गा महिला मंडळांना वार्षिक १५ हजार रुपयांचे अनुदान सुरू करावे, जिल्हा मानधन समिती स्थापन करावी, प्रलंबित मानधन अर्ज मंजूर करावेत तसेच इंद्रायणी नदीचे खोलीकरण करावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी वारकरी बांधवांनी शासनाने वारकरी संप्रदायाच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. निवेदनावर विविध वारकरी प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत.








