करमाळा, सोलापूर (युवा क्रांती वृतसेवा) : संगोबा येथे आलेल्या पुरामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बांधावर जाऊन पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व नुकसानग्रस्त पिकांचा आढावा घेतला.

पूरामुळे झालेल्या नुकसानीबाबत त्यांनी संबंधित प्रशासनाला तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत पोहोचवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. शेतकऱ्यांनी यावेळी निचऱ्याचा अभाव, पिकांचे नुकसान आणि पुढील पेरणीसाठी आवश्यक साधनसामग्रीबाबत आपल्या अडचणी मांडल्या.
प्रशासनानेही लवकरात लवकर सर्वेक्षण पूर्ण करून मदतीचा अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले आहे.











