खामगाव | (आकाश बोरसे) : दि. 13 जून- युवा सेना खामगाव शहर व तालुका प्रमुख पदाधिकाऱ्यांची अत्यंत महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला युवा सेना सहसचिव महाराष्ट्र राज्य, बुलढाणा लोकसभा संपर्कप्रमुख तथा बुलढाणा जिल्हाप्रमुख मा. ऋषीभाऊ जाधव तसेच युवा सेना लोकसभा अध्यक्ष मा. चेतन घिवे पाटील यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
बैठकीदरम्यान आगामी काळातील युवा सेनेची संघटनात्मक बांधणी, युवा सेना सदस्य नोंदणी अभियान तसेच S.I.R संदर्भातील महत्त्वपूर्ण सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

“गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर तळागाळात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी जोमाने काम करण्याचे आवाहन मा. ऋषीभाऊ जाधव यांनी केले.
यावेळी युवा सेना उपजिल्हाप्रमुख डॉ. संजय पाटील, तालुका प्रमुख अमोल फेरंग, तालुका प्रमुख बहादुर बघे, शहर प्रमुख राहुल कळमकार, विधानसभा संपर्कप्रमुख सागर गावंडे, तालुका संघटक गोपाल वरणकार, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख विक्की सारवान यांच्यासह खामगाव तालुका व शहरातील उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख आणि अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत संघटन विस्तार, सदस्य नोंदणी आणि आगामी राजकीय व सामाजिक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. (युवा क्रांती वृत्तसेवा)











