शेगाव, दि. 19 जून (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील विविध नागरी समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाची नगर परिषद प्रशासनाने दखल घेतली असून संबंधित कामे १५ दिवसांत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.
मनसेने शहरातील प्रभाग क्रमांक २, ३ व १५ मधील विविध नागरी समस्यांबाबत नगर परिषद प्रशासनाकडे निवेदन सादर केले होते. यामध्ये भोईपुरा, धनगरपुरा, गणेश नगर, यशोदा नगर, तीन पुलते परिसरातील चोकअप झालेल्या नाल्यांची साफसफाई, खराब रस्त्यांची दुरुस्ती तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांची कामे तातडीने करण्याची मागणी करण्यात आली होती.
या मागण्यांवर तत्काळ कार्यवाही न झाल्याने मनसेच्या वतीने शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत नगर परिषद प्रशासनाने संबंधित समस्यांवर सकारात्मक कार्यवाही सुरू असल्याचे सांगत सर्व कामे १५ दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.
यावेळी मनसेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमित बापू देशमुख, उपजिल्हाध्यक्ष अशोक पाटील, शेगाव तालुकाध्यक्ष नितीश भावरकर, शहराध्यक्ष परमेश्वर लाहुडकर, शहर उपाध्यक्ष विनोद फुंडकर, सोपान भागेवार, योगेश खांडेकर, वाहतूक सेना अध्यक्ष राम इंगळे, उपतालुकाध्यक्ष रोहित भांबेरे, विद्यार्थी सेना अध्यक्ष सचिन नागे, विद्यार्थी सेना उपाध्यक्ष स्वयंपांडव, शहर सचिव नारायण शेगोकार, विभाग प्रमुख देवा चिमणकर, धनंजय लोखंडे, संकेत देशमुख, ज्ञानेश्वर नंदाने, गजानन फासे, मयूर चिंचोलकर तसेच किरण शेगोकार, समाधान शेगोकार, नितीन पद्मने, महादेव माळी, अमोल मेतकर, गोपाल नेरकर, महादेव दही, गणेश राऊत, दत्ता वडतकर, राहुल वानखेडे, अमित दामोदर, सुनील वनारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









