---Advertisement---

Sangrampur Voter List 2026: मतदार यादी निर्दोष करण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करा; तहसीलदार प्रशांत पाटील यांचे आवाहन!!

---Advertisement---

संग्रामपूर | (आकाश बोरसे) : राज्यात सुरू असलेल्या मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SIR) अभियानाअंतर्गत जळगाव (जामोद) विधानसभा मतदारसंघातील संग्रामपूर तालुक्यात मतदार पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तालुक्यातील सर्व पात्र मतदारांनी ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत मतदार गणना अर्ज, आवश्यक कागदपत्रे व स्वाक्षरीसह संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे जमा करावीत, असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.

निवडणूक विभागाच्या माहितीनुसार, संग्रामपूर तालुक्यातील १०९ मतदान केंद्रांपैकी ६४ बीएलओंनी १०० टक्के काम पूर्ण केले असून, एकूण कामाची प्रगती ९७.३८ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. उर्वरित काम वेगाने सुरू आहे.

तालुक्यात १ लाख २ हजार १०६ मतदार नोंदणीकृत असून, त्यापैकी ९८ हजार ४२७ मतदारांनी आवश्यक कागदपत्रे व स्वाक्षरीसह अर्ज सादर केले आहेत.

मतदार यादी अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी बीएलओ, सहायक बीएलओ, पर्यवेक्षक तसेच संबंधित अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधत आहेत. त्यामुळे ज्या मतदारांनी अद्याप कागदपत्रे सादर केलेली नाहीत, त्यांनी ८ ऑगस्टपूर्वी आवश्यक कागदपत्रे आपल्या बीएलओकडे जमा करावीत, असे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी स्पष्ट केले.

याबाबतची माहिती नायब तहसीलदार तथा SIR सहायक मतदार नोंदणी अधिकारी विकास शिंदे, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी गजानन ठाकरे आणि संगणक परिचालक गोपाल बोंबटकर यांनी दिली.

महत्त्वाचे मुद्दे

  • ८ ऑगस्ट २०२६ ही कागदपत्रे सादर करण्याची अंतिम मुदत.
  • संग्रामपूर तालुक्यात १०९ मतदान केंद्रे.
  • एकूण मतदार: १,०२,१०६.
  • कागदपत्रे सादर केलेले मतदार: ९८,४२७.
  • पडताळणीचे काम ९७.३८% पूर्ण.
  • ६४ बीएलओंनी १००% काम पूर्ण केले. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment