---Advertisement---

Shegaon : श्री गजानन महाराज संस्थानकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी १ कोटी ११ लाखांची मदत!!

---Advertisement---

शेगाव | (युवा क्रांर्ती वृत्तसेवा) : यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे दुष्काळाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानने पुढाकार घेतला आहे. संस्थानच्या वतीने ‘मुख्यमंत्री सहायता निधी’साठी १ कोटी ११ लाख रुपयांचा मदत निधी देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांवर ओढवलेल्या दुष्काळी परिस्थितीची दखल घेत श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात आला. दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी धनादेशाद्वारे १ कोटी ११ लाख रुपयांचा निधी सुपूर्द करण्यात आल्याचे संस्थानच्या प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी आणि त्यांच्या अडचणीच्या काळात आधार मिळावा, या उद्देशाने संस्थानने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ही मोठी आर्थिक मदत केली आहे. श्री गजानन महाराज संस्थानच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीची भावना अधोरेखित झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment