शेगाव (डी ललित) : शेगाव शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत तब्बल १ लाख २४ हजार रुपयांची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई २४ सप्टेंबर रोजी रात्री जुन्या बसस्थानक परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ करण्यात आली.
पोलिस उपनिरीक्षक संदीप बारींगे हे रात्री गस्तीवर असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी कारवाई केली. यावेळी सय्यद अक्रम सय्यद हनीफ (वय ३२, रा. बाळापूर) याच्याकडून एका बॉक्समध्ये टँगो पंचच्या ११९ सीलबंद बाटल्या, तर दुसऱ्या बॉक्समध्ये देशी दारू संत्रा ९० एमएलच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या.
पोलिसांनी सदर दारूसह एकूण १ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीविरुद्ध कलम ६५ (ई), महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार निमिष मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश वाकेकर करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)








