जळगाव जामोद (आकाश बोरसे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा निकाल २ मे रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. या निकालात जळगाव जामोद शहरातील केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाने पुन्हा एकदा घवघवीत यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
या कनिष्ठ महाविद्यालयातून एकूण १२३ विद्यार्थी बारावी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. शाखानिहाय विद्यार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे:
- इंग्रजी माध्यम वाणिज्य – २४
- विज्ञान शाखा – १५
- कला शाखा – ३५
- वाणिज्य (मराठी माध्यम) – ४९
👉 निकालाचा आढावा घेतला असता,
- इंग्रजी वाणिज्य व विज्ञान शाखा – १००% निकाल
- कला शाखा – ६५.६६%
- वाणिज्य (मराठी) – ८९.५८%
असा उत्कृष्ट निकाल नोंदवण्यात आला आहे.
🏆 शाखानिहाय प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी:
- इंग्रजी वाणिज्य: भाविक संतोष फलन – ८०.५०%
- वाणिज्य (मराठी): कु. पूजा अनंता वसुले – ८०.५०%
- कला शाखा: कु. प्रणाली अरुण ठाकरे – ७४.३३%
- विज्ञान शाखा: कु. वैष्णवी सुरेश वानखडे – ६३.५३%
या यशाबद्दल सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष डॉ. किशोर केला, मुख्य संयोजिका डॉ. स्वाती केला, प्राचार्य विनायक उमाळे तसेच शिक्षकवर्गातील प्रकाश भुते, विनोद ईश्वरे, अरुणा व्यवहारे, मनीषा म्हसाळ, राजेश आठवले, अमोल वानखडे, आकाश निलजे, गीता पलन, अमित धूत, मधुरीना चोपडे, सुचिता अस्वार यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. (युवा क्रांती वृत्तसेवा)








