---Advertisement---

जळगाव जामोद येथील दि न्यू इरा कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी निकालात दबदबा; विज्ञान शाखेचा 100% निकाल!!

---Advertisement---

जळगाव जामोद (आकाश बोरसे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता बारावीच्या निकालात जळगाव जामोद येथील दि न्यू इरा कनिष्ठ महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेने १०० टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखली असून कला शाखेनेही ८२.५० टक्के निकालासह यशाची पताका फडकवली आहे.

विज्ञान शाखेतून यावर्षी एकूण १८१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विशेष म्हणजे सर्व १८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त केली आहे.

विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थी

  • प्रथम क्रमांक: कु. ज्ञानेश्वरी विठ्ठल निलजे — 84.83%
  • द्वितीय क्रमांक: कु. ऋचा अमित वडोदकर व युवराज संजयसिंग राजपूत — 83.67%
  • तृतीय क्रमांक: कु. वैष्णवी दीपक जोध — 79.17%

याशिवाय २६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ११४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ३४ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.

कला शाखेचाही उल्लेखनीय निकाल

कला शाखेतून १२० विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ८२.५० इतकी नोंदविण्यात आली आहे.

कला शाखेतील गुणवंत विद्यार्थी

  • प्रथम क्रमांक: कु. राधा रामकृष्ण पारस्कर — 84.83%
  • द्वितीय क्रमांक: कु. रुचिता निलेश वंडाळे — 83.67%
  • तृतीय क्रमांक: कु. दिव्या जयवंत ताकोते — 82.67%

कला शाखेतील ८ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी, २९ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, ४५ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर १७ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणी मिळवली आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश कुळकर्णी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद आणि पालकांनी आनंद व्यक्त केला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे परिसरातून अभिनंदन होत आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment