---Advertisement---

जयंती उत्सवात शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा; जळगाव जामोद येथे शांतता समिती बैठक संपन्न!!

---Advertisement---

जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : दि. १२ एप्रिल ला महापुरुषांच्या जयंती उत्सवावेळी सामाजिक सलोखा अबाधित राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत जिल्हा पोलीस अधीक्षकनिलेश तांबे यांनी समाजकंटकांना कडक इशारा दिला. शांततेचा भंग करणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगारण्यास पोलीस प्रशासन मागे-पुढे पाहणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

जळगाव जामोद येथे आयोजित शांतता समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, नायब तहसीलदार भरत किटे, तसेच गटशिक्षणाधिकारी श्रीकांत जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने या सभेला प्रतिसाद दिला.

⚖️ नियमांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी आपल्या भाषणात शिस्त आणि जबाबदारीवर विशेष भर दिला.
ते म्हणाले की, “माझ्या वर्तणुकीमुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही, ही भावना प्रत्येकाने जपली पाहिजे. मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन झाल्यास किंवा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न झाल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.”

तसेच वर्गणीचा पैसा अनावश्यक खर्चावर न करता समाजाच्या प्रगतीसाठी वापरण्याचेही आवाहन त्यांनी केले.

📱 सोशल मीडियाबाबत सतर्कतेचे आवाहन

अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी सोशल मीडियाच्या वापराबाबत नागरिकांना सतर्क केले.
“फेसबुक, व्हॉट्सअॅपवरील प्रत्येक माहिती खरीच असेल असे नाही. अफवांना बळी पडू नका,” असे ते म्हणाले.

यावेळी बुलढाणा जिल्हा पोलीस विभागाकडून “एकच ध्यास, अर्धा तास अभ्यास” हा अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या उपक्रमाद्वारे तरुणांना सोशल मीडियापासून दूर ठेवून वाचनाकडे वळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

👥 मान्यवरांची उपस्थिती

या बैठकीस सचिन देशमुख, देवा दामोदर, डॉ. सतीश शिरेकर, सुनिता हेलोडे, मंजूर खान, नगरसेवक सिद्धार्थ हेलोडे, व्यापारी संघटनेचे अजय वानखडे, पत्रकार संघटनेचे कैलास देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, गृहरक्षक दलाचे जवान तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार नितीन कुमार पाटील यांनी केले, तर सुत्रसंचालन प्रशांत तायडे यांनी केले. आभार प्रदर्शन ठाणेदार सोनवणे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

या बैठकीद्वारे जळगाव जामोद पोलीस प्रशासनाने एकीकडे शांतता आणि सहकार्याचा संदेश दिला, तर दुसरीकडे कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा स्पष्ट इशाराही दिला आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment