खामगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : लहुजी नगर, शेगाव येथील उध्वस्त करण्यात आलेल्या झोपडीधारकांना महसूल शासन निर्णय 2011 नुसार पर्यायी जागा उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन व जागेचे वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी विदर्भ झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जी. ओ. तायडे यांनी खामगाव येथील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयात निवेदन सादर केले.
यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान उपविभागीय अधिकारी पुरी साहेब यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. संबंधित झोपडीधारकांना न्याय मिळावा यासाठी न्यायोचित कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

लहुजी नगर येथील तब्बल 192 झोपडीधारकांना पर्यायी जागा व पुनर्वसन मिळावे, ही विदर्भ झोपडपट्टी सुरक्षा दलाची प्रमुख मागणी असून, यासाठी पुढील कायदेशीर व प्रशासकीय पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे जी. ओ. तायडे यांनी सांगितले.









