---Advertisement---

पीएम किसान व सीएम किसान योजनेच्या निधीपासून शेतकरी वंचित; अक्षय पाटील यांचा कृषी विभागाला आंदोलनाचा इशारा!!

---Advertisement---

जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना तसेच राज्य सरकारची सीएम किसान योजना यांचे लाभ अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक कारणांमुळे मिळत नसल्याने जळगाव जामोद तालुक्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या योजनांचे पैसे खात्यात जमा व्हावेत यासाठी शेतकरी वारंवार कृषी विभागाच्या कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून तांत्रिक अडचणींचे कारण सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

ही बाब शेतकऱ्यांनी युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी आज, दि. 22 जून रोजी आपल्या सहकाऱ्यांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून ज्या शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी येत आहेत त्यांच्या समस्या तातडीने दूर करून त्यांना सहकार्य करण्याची मागणी केली.

तसेच, संबंधित शेतकऱ्यांचे रखडलेले पैसे लवकरात लवकर खात्यात जमा न झाल्यास किंवा त्यांना विनाकारण त्रास दिल्यास कृषी अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अक्षय पाटील यांनी दिला.

यावेळी अनिलसिंह राजपूत, शिवदास खिरोडकार, अजय गिरी, वैभव जाणे, अमोल बहादरे, सदाशिव जाणे, सोपान पाटील, संतोष गणगे, नवलसिंग पावरा, राजेंद्र राखुंडे, गणेश जाणे, पुरुषोत्तम अढाव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment