---Advertisement---

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ३०१वा जन्मोत्सव वडगाव पाटण येथे उत्साहात साजरा!!

---Advertisement---

जळगाव जामोद (आकाश बोरसे) : दि. ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त वडगाव पाटण (ता. जळगाव जामोद) येथे भव्य जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामविजयजी बुरुंगले होते, तर उद्घाटक म्हणून आमदार तथा माजी मंत्री डॉ. संजयभाऊ कुटे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून सौ. स्वातीताई वाकेकर, दत्तात्रयभाऊ पाटील, गजाननभाऊ वाघ, सचिनभाऊ देशमुख, अविनाशभाऊ उमरकर, ॲड. भालेराव साहेब, निलेशभाऊ साबे, वाघमारे सर, श्रीकृष्ण बोळे, मनिषाताई बोळे, श्रीराम सुशिर, प्रमोद तितरे, दिलीप भिवटे, अशोक साबे, विठ्ठल सुशिर, मनोहर खाळपे, सुनिल भिवटे, रामदास तितरे, विठ्ठल घुले सरपंच, दिलीप जुंबळे, दत्ता इलामे, ईश्वर घुले, आदित्य चराटे यांच्यासह धनगर समाज महासंघ, मल्हार सेना आणि कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कु. गायत्री दिलीप जुंबळे हिने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित माहितीपूर्ण मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवींच्या लोककल्याणकारी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा समाजाने आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अरुण बोळे, शुभम बोळे, वासुदेव लोनाग्रे, गजानन पाटील, विलास जाधव, रामचंद्र घुले, मारोती धर्माळ, भिकाजी खंडारे, विठ्ठल बोळे, भास्कर राऊत, संतोष बोळे, शत्रुघ्न पाटील, गोपाल राजनकार, सुपडा खंडारे, सोपान वाघोदे व दीपक रणसिंगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाला तालुक्यातील विविध समाजबांधव, गावकरी, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक साबे यांनी केले, प्रास्ताविक राजेश भिवटे सर यांनी तर आभार प्रदर्शन दिलीप भिवटे यांनी केले. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment