जळगाव जामोद (आकाश बोरसे) : जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील भालांजन गावात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. विजय मुसा किराडिया (वय 35) यांनी आपल्या चार लहान मुलांना शेतातील विहिरीत फेकून स्वतःही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती जळगाव जामोद पोलीस स्टेशनला सकाळी पावणे अकराच्या सुमारास मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून पुढील तपास व कार्यवाही सुरू करण्यात आली.
मृतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- विजय मुसा किराडिया (वय 35)
- प्रीत विजय किराडिया (वय 7)
- प्राची विजय किराडिया (वय 5)
- पूर्वी विजय किराडिया (वय 4)
- पियुष विजय किराडिया (वय 2)
प्राथमिक माहितीनुसार, विजय किराडिया यांनी पत्नी रीना हिला एक दिवस आधी तिच्या माहेरी सोडले होते. प्रथमदर्शनी पती-पत्नीतील वादातून ही घटना घडल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)









