---Advertisement---

Shegaon Crime News : शेगावमध्ये दिव्यांग महिलेला शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!!

---Advertisement---

शेगाव (डी ललित) : व्यंकटेश नगर परिसरात दिव्यांग महिलेला घरात येऊन लोटपाट करणे, अश्लील शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या बहिणीच्या मुलाचा आरोपींसोबत जगदंबा चौक येथे वाद झाला होता. त्यानंतर आरोपी त्यांच्या घरी आले आणि प्रशांत कुठे आहे, अशी विचारणा केली. यावेळी फिर्यादीने घरात अचानक येण्याबाबत विचारणा केली असता आरोपींनी त्यांच्यासोबत लोटपाट केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

फिर्यादी दिव्यांग असून एका पायाने चालता येत नसल्याचे सांगितले आहे. यावेळी आरोपी क्रमांक 1 किशोर डाबेराव याने त्यांना अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर सुमारे दहा मिनिटांनी आरोपी क्रमांक 2 श्रीनीथ किशोर डाबेराव याने प्रशांतला घराबाहेर काढा, अन्यथा सर्वांना जीवे मारू, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपी क्रमांक 3 अक्षीत डाबेराव आणि आरोपी क्रमांक 4 रोशन बावणे यांनीही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी 25 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7.13 वाजता शेगाव शहर पोलीस ठाण्यात BNS कलम 333, 296, 115(2), 351(2), 3(5) तसेच अपंग व्यक्ती अधिनियम 2016 मधील कलम 92(अ), 92(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणाचा पुढील तपास पोहेका सुनील सुसर करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment