---Advertisement---

Nagarparishad notis MNS देऊनही सुरूच निकृष्ट काम; ‘नगरसेवक-आमदार खिशात’ म्हणणाऱ्या कंत्राटदारावर मनसेचा इशारा!

---Advertisement---

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये भिमराव शेंगोकार ते विजय गणोरकर यांच्या खळ्यापर्यंत सुरू असलेल्या नाल्याच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित कामाची चौकशी करून दोषी कंत्राटदाराची बिले तात्काळ रोखावीत, अशी मागणी मनसेने शेगाव नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे केली.

मनसेच्या म्हणण्यानुसार, नगर परिषद प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला तब्बल तीन वेळा काम बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, त्यानंतरही कंत्राटदाराने काम सुरूच ठेवले असून, प्रशासनाच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याहून गंभीर आरोप म्हणजे संबंधित कंत्राटदार “माझे नगरसेवक आणि आमदार खिशात आहेत. माझे बिल कोणीही रोखू शकत नाही,” अशी भाषा वापरत असल्याचा दावा मनसेने केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या अधिकारालाच आव्हान दिले जात असल्याचे मनसेचे म्हणणे आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांनी नगर परिषद अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता, “तो ऐकत नाही, तर आम्ही काय करू?” असे उत्तर मिळाल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम सुरू राहून त्याचा फटका नागरिकांनाच बसणार का, असा सवालही मनसेने उपस्थित केला.

मनसेने या प्रकाराला लोकशाही व्यवस्थेचा अवमान असल्याचे म्हणत दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तालुका अध्यक्ष नितीश भावरकर आणि शहर अध्यक्ष परमेश्वर लाहूडकर यांनी दिला.

हे निवेदन जिल्हाध्यक्ष अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यावेळी विनोद पुंडकर, सचिन नागे, समाधान शेगोकार, किरण शेगोकार यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment