---Advertisement---

Sangrampur News : विश्वासराव वरणकार यांची भाजप किसान आघाडीच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती; संग्रामपूर तालुका भाजपकडून सत्कार!!

---Advertisement---

पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा विश्वास.

संग्रामपूर (आकाश बोरसे) : संग्रामपूर तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष विश्वासरावजी वरणकार पाटील यांची भारतीय जनता पक्षाच्या बुलढाणा जिल्हा किसान आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल संपूर्ण संग्रामपूर तालुका भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

माजी मंत्री तथा आमदार डॉ. संजय कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वासराव वरणकार यांच्यावर पक्षाने नवीन जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल किसान आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष संजयभाऊ बोरसे, राजूभाऊ मुंयाडे, तालुका भाजप अध्यक्ष भाऊराव पाटील, मंगेश धाडे, गजानन दाने, गजानन ठाकरे, दत्ताभाऊ मारोडे, गणेश साबळे, संतोष चिकटे, शुभम गायकी, शामभाऊ आकोटकार, डॉ. गणेश दातीर, शेतकरी खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष तथा संचालक राजुबापू देशमुख, महादेव फाळके, प्रकाशभाऊ उभे, प्रकाशशेठ राठी यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी सत्काराला उत्तर देताना विश्वासराव वरणकार पाटील म्हणाले, “आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा, प्रेम आणि आशीर्वादामुळे मला पक्षाचे काम करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळाली आहे. भविष्यातही आपले प्रेम व आशीर्वाद माझ्यासोबत राहतील, अशी अपेक्षा आहे.”

पुढे ते म्हणाले की, “माजी मंत्री तथा आमदार डॉ. संजयजी कुटे साहेब आणि पक्ष नेतृत्वाने किसान आघाडीच्या जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. ही जबाबदारी सर्वांना सोबत घेऊन, निष्ठेने आणि पूर्ण वेळ पक्षसंघटनेसाठी काम करून पार पाडणार आहे. आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी व्यक्तिशः ऋणी आहे.”

त्यांच्या नियुक्तीमुळे संग्रामपूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, शेतकरी व किसान आघाडीच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. (युव क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment