---Advertisement---

Jalgaon Jamod महाविद्यालयात गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळाची कार्यकारिणी गठित!

---Advertisement---

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या नेतृत्वगुणांना मिळणार चालना!!

जळगाव जामोद (आकाश बोरसे) : श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय, जळगाव जामोद येथील गृह अर्थशास्त्र विभागाच्या अभ्यास मंडळाची कार्यकारिणी ३ सप्टेंबर २०२६ रोजी गठित करण्यात आली. बी.ए. भाग एक, भाग दोन आणि भाग तीनमध्ये गृह अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनींचा या कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

अभ्यास मंडळाच्या कार्यकारिणीसाठी विद्यार्थिनींकडून प्रथम अर्ज मागविण्यात आले. त्यानंतर ईश्वरचिठ्ठीच्या माध्यमातून विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, प्रसिद्धीप्रमुख तसेच सदस्य अशा विविध पदांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

गृह अर्थशास्त्र विभागाच्या वतीने वर्षभर राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक आणि कौशल्य विकासात्मक उपक्रम अभ्यास मंडळाच्या माध्यमातून आयोजित केले जातात. यावेळी एकूण ३० विद्यार्थिनींचा सहभाग होता. त्यापैकी १५ विद्यार्थिनींची अभ्यास मंडळाच्या कार्यकारिणीसाठी निवड करण्यात आली.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :

अध्यक्ष : रेणुका बुंदे (बी.ए. अंतिम वर्ष)
उपाध्यक्ष : भाग्यश्री वाघ
सचिव : निकिता वाशीमकर
सहसचिव : श्रेया तेलंग
प्रसिद्धीप्रमुख : सानिका भालतडक

सदस्य : लक्ष्मी बोदडे, हर्षा लंगोटे, वैष्णवी चोपडे, ऋतुजा गिरे, वैष्णवी खोरगडे, निकिता गव्हाळे, कृषी खराटे, साक्षी बांबटकर, गौरी राजुरकर, प्रगती दंडे, मोनो राऊत, दिपाली डावर, उषा मुजालदार.

गृह अर्थशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका अर्चना जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी गठित करण्यात आली. विद्यार्थिनींमध्ये नेतृत्वगुण, संघटनकौशल्य, निर्णयक्षमता आणि विविध कौशल्यांचा विकास व्हावा, तसेच गृह अर्थशास्त्र विषयाशी संबंधित विविध उपक्रम प्रभावीपणे राबविता यावेत, हा अभ्यास मंडळाचा प्रमुख उद्देश आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment