---Advertisement---

Jalgaon Jamod : जळगाव जामोदात प्रथमच भव्य श्रीकृष्ण जन्मोत्सव; ISKCONच्या वतीने भक्तिमय सोहळ्याचे आयोजन!!

---Advertisement---

हरिनाम संकीर्तन, ओडिसी नृत्य, बाल गोपाल अभिषेक अन् 56 भोगांचा सोहळा; भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन!

जळगाव जामोद (आकाश बोरसे) : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (ISKCON) यांच्या वतीने जळगाव जामोद शहरात प्रथमच भव्य श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, 5 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत श्री संत जलाराम बाबा मंदिर, सांस्कृतिक भवनाजवळ, जळगाव जामोद येथे हा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा पार पडणार आहे.

या जन्मोत्सवात मधुर हरिनाम संकीर्तन व भजन, ओडिसी स्वागत नृत्य, बाल गोपाल अभिषेक, श्रीकृष्ण जन्मकथा, 56 भोग अर्पण तसेच पालना महाआरती व संकीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

विश्वविख्यात भागवत प्रवक्त्यांची प्रमुख उपस्थिती

या भक्तिमय सोहळ्यासाठी श्रीमान अनंतशेष प्रभुजी यांची प्रमुख प्रवक्ते म्हणून उपस्थिती राहणार आहे. ते विदर्भ-अमरावती क्षेत्रीय झोनल सुपरवायझर म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे आध्यात्मिक महत्त्व भाविकांना जाणून घेता येणार आहे. तसेच या कार्यक्रमाला माजी कॅबिनेट मंत्री व आमदार डॉ. संजयजी कुटे यांचीही उपस्थिती लाभणार आहे.

श्रीकृष्ण जन्मोत्सवानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरासह परिसरातील नागरिकांनी आणि कृष्णभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

“हरे कृष्ण, हरे कृष्ण… कृष्ण कृष्ण, हरे हरे!” या भक्तिमय जयघोषाने जळगाव जामोद शहरात श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा भव्य सोहळा रंगणार असून, शहरातील भाविकांसाठी हा उत्सव विशेष आकर्षणाचा ठरणार आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment