---Advertisement---

खामगाव–जालना रेल्वेमार्गाला गती; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी भेट!!

---Advertisement---

बुलढाणा (आकाश बोरसे ): दि. 16 एप्रिल 2026 आज खामगाव–जालना रेल्वेमार्गाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा वेगाने सुरू असून यासंदर्भात केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत रेल्वेमार्गाच्या अंतिम मंजुरीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

खामगाव–जालना हा महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्ग मध्य व सेंट्रल रेल्वेला जोडणारा असून बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या पूंजी निवेश कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आला आहे. या रेल्वेमार्गासाठी आवश्यक असलेल्या निधीपैकी 50 टक्के हिस्सा राज्य सरकारकडून उचलण्यात येणार असून त्यासंदर्भातील तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यानंतर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडून या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून त्यांनी रेल्वेमंत्र्यांशी वारंवार चर्चा केली आहे. आज झालेल्या सदिच्छा भेटीतही त्यांनी खामगाव–जालना रेल्वेमार्गाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शवली असल्याचे सांगण्यात येत आहे.

या रेल्वेमार्गामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या औद्योगिक, आर्थिक व वाहतूक विकासाला मोठी चालना मिळणार असून नागरिकांना रेल्वे सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या अंतिम मंजुरीबाबत जिल्हावासीयांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment